Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील माळी भवन जवळ एका ६६ वर्षीय वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या होत्या. त्यांना तातडीने भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे उपचारात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कांताबाई धर्मराज सोनवणे (वय 66, रा. साक्रि फाटा आवटे नगर, भुसावळ) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, भुसावळ शहरातील माळी भवन जवळ बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कांताबाई सोनवणे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. परिसरातील नागरिकांनी तातडीने खाजगी वाहनातून त्यांना भुसावळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले होते. त्यानंतर यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मानवतकर यांनी तपासणी केली असता वृद्ध महिलेला मयत घोषित केले. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे

Exit mobile version