Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याने प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

आठ महिन्यापुर्वी कुत्र्याने घेतला होता चावा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावातील ५१ वर्षीय प्रौढ व्यक्तीला पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने आठ महिन्यांपुर्वी चावा घेतल्याची घटना घडली होती. रेबीजची लक्षणे जाणवल्याने रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी दुपारी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर दगडू बडगुजर रा. पिंप्री खुर्द ता.धरणगाव जि.जळगाव असे मृत प्रौढाचे नाव आहे.

 

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात ईश्वर दगडू बडगुजर हे आपल्या परिसारासह राहत होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, त्यांना आठ महिन्यांपुर्वी पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी कुत्र्याच्या चावाकडे दुर्लक्ष केले होत. परंतू २६ जून रोजी त्यांना अचानक ताप आला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने मुंबईतील सायन रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.

Exit mobile version