Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या प्रौढाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळ एका अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी प्रौढ बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास समोर आली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे दुकानाजवळ अनोळखी अंदाजे ४५ वर्षे प्रौढ व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. यासंदर्भात काही स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी व पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या प्रौढाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी ६ वाजता त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान मयताची ओळख पटलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाहीतर नातेवाईकांनी मैद्याची ओळख पटवण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांनी केले आहे.

Exit mobile version