Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरात अचानक कोसळल्याने जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात अचानक कोसळून पडल्याने बांभोरी गावातील ३२ वर्षीय तरूणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी गावात समाधान बुधा शिंदे हा तरूण वास्तव्याला होता. हात मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरी असतांना अचानक कोसळल्याने जखमी झाला होता. त्याला नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होत. सोमवारी १० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सामधान शिंदे याचा मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिण व भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version