Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुटुंबियांसोबत झालेल्या भांडणामुळे विषारीद्रव्य प्राशन केलेला जतीन श्याम लेहलकर (वय २०, रा. चौघुले प्लॉट, शनीपेठ, जळगाव) हा तरुणावर दोन दिवसांपासून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता त्याच्यावर उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नांेद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिससरात जतीन लेहलकर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांचे नवीन बसस्थानक परिसरात दुकान असून तेथे पाणी बॉटलसह मोबाईल रिचार्ज करुन तो वडीलांना व्यावसायात हातभार लावित होता. सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांचे कुटुंबियांसोबत किरकोळ भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात ठेवून जतीनने संतापाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर तो ममुराबाद रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ गेला. याठिकाणी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने वडीलांना फोन करुन आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्याच्या वडीलांनी तात्काळ त्याठिकाणी जावून मुलगा जतीनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे जतीनची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना बुधवारी २ जानेवारी राजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता.

मयत जतीन लेहलकर हा अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू होता. लहानपणापासूनच तो वडीलांना व्यवसायात मदत देखील करीत होता. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्या आई वडीलांसह भावाला मानसिक धक्का बसला आहे. तसेच त्याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version