Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे आमरण उपोषण सुरू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे.

गेल्या २५ ते ३० वर्षापासून पाचोरा नगरपालिकेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झालेला असून हा ठराव मंजूर आहे. परंतु प्रत्यक्षात नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अजून पर्यंत बसविण्यात आला नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, माजी नगरसेवक अशोक मोरे, वासुदेव माळी, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे यांचे दि. २० जून रोजी सकाळी १० वाजेपासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

नगरपालिका प्रशासनाने त्वरित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा नियोजित जागेवर बसवावा, अशी उपोषणकर्त्यांतर्फे मागणी करण्यात येत आहे. या उपोषणास समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा  राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखा, पाचोरा, मराठा सेवा संघ (पाचोरा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पाचोरा), संभाजी ब्रिगेड (पाचोरा), युवक काँग्रेस (पाचोरा), शिवस्वराज्य युवा फाउंडेशन (पाचोरा) सह पाचोरा शहरातील पुरोगामी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच उपोषणास अॅड. अविनाश भालेराव, अॅड. अण्णासाहेब भोईटे, अॅड. अनिल पाटील, अॅड. रणजीत तडवी, नगरसेवक बशीर बागवान, विलास पाटील, खलील देशमुख, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, मच्छिंद्र जाधव, धनराज मेघराज पाटील, मतीन बागवान यांनी उपोषणास समर्थन दिले आहे.

Exit mobile version