Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी, गार्ड वर्कसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी पाटबंधारे विभागातील सुरक्षा रक्षकांना त्वरीत नियुक्ती करून वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभाग व गार्ड वर्कस युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

याविषयी दिलेल्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, “जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आश्वासने बाबत तापी पाटबंधारे विभागातील मुख्य अभियंता निवास, तापी पाटबंधारे विभाग जळगाव यांचे निवासस्थानी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ पासून उपविभागीय अभियंता सीके पाटील यांच्या तोंडी आदेशाने ठेवण्यात आले होते. सदर सुरक्षा रक्षकांची वरील कार्यालयाने कार्योत्तर मंजुरीही दिली आहे.

मात्र वरील अभियंता यांनी सर्व नियम जवळून पाच महिने काम केल्यानंतर त्यांना विना वेतन कामावरून कमी करून मॅक्स एजन्सी सुरक्षारक्षक कोणतीही कायदेशीर पूर्तता न करता निविदा न काढता ठेवण्यात आले. तसेच गेल्या दोन वर्षापासून वाघुर विभागास पूर्वी काम केलेले सुरक्षा रक्षकास घेण्यात यावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाने प्रतीक्षा यादीवरील सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली आहे; जी बेकायदेशीर आहे.

 

तसंच या विषयावर जानेवारी २०२१ मध्ये उपोषणही करण्यात आलं. जानेवारी महिन्यात सुरक्षा रक्षक मंडळाची बांद्रा मुंबई कार्यालयाने मैदाणी चाचणी घेण्याबाबत मंजुरी दिली असता सुरक्षा मंडळाचे अधिकारी त्यासाठी विल दिला नाही. सुरक्षा मंडळाचा कारभार हा अतिशय कासवगतीने सुरू असून सुरक्षा रक्षकांची राजरोसपणे पिळवणूक सुरू आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नाही.” असे नमूद करण्यात आले आहे.

त्यासाठी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटीने मुख्य अभियंता निवास, तापी विभाग, महामंडळ येथे कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांचा त्वरित वेतन देण्यात येऊन त्यांची नियुक्ती करण्यात यावी. बेकायदेशीर ठेवलेले मेस्कोच्या सुरक्षारक्षकाऐवजी मंडळाचे सुरक्षा रक्षक नेमावेत. आणि सरसकट सुरक्षारक्षकांची मैदानी चाचणी करावी या मागणीसाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

मागण्यासाठी सोमा कढरे, पुनमचंद निकम, शांताराम पाटील, विजय महाले, सुरसिंग पाटील, गणेश मराठे, राजेंद्र माळी, फकीरा आणि गौतम पाटवे उपोषणाला बसलेले आहेत

Exit mobile version