पाचोऱ्यात बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनतर्फे आमरण उपोषण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी जिल्हा सिव्हिल सर्जन, जळगाव यांच्याकडे नवजात बाळाच्या मृत्यु प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. मात्र, महिनाभरापासून कोणतीही चौकशी न झाल्याने ते आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेचा हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्यासंदर्भात तसेच ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडुन होत असलेली रुग्णांची लुट थांबवावी. तसेच पाचोरा ग्रामीण रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या पाचोरा ग्रामिण रुग्णालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा सिव्हिल सर्जन जळगांव यांनी पाचोरा पोलीसांना तात्काळ आदेश करावेत, पोलीस निरिक्षक, पाचोरा यांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बाळाच्या मृत्युस जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, जिल्हा सिव्हिल सर्जन, जळगांव यांनी मयत बाळाचा शवविच्छेदन रिपोर्ट तसेच फॉरेन्सिक लॅबचा तपासणी अहवाल (रिपोर्ट) पाचोरा पोलीसांना गुन्हा दाखल करण्यासाठी तात्काळ सादर करावा.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील महिलांची प्रसुतीच्यावेळी (शिजरसाठी) सतत २ हजार रुपये ते अडीच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या रुग्णालयातील लाचखोर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. या मागण्यांसंदर्भात येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत.

 

 

 

Protected Content