Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल-भुसावळ रस्त्यावर जीवघेणे खड्डे !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल ते भुसावळ दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाले असून यामुळे भीषण अपघाताची शक्यता बळावली आहे. याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

येथील यावल ते भुसावळ मार्गावरील शहरातील भुसावळ टी पॉईंटवर सम्राट मॉल समोर आणी जुना भुसावळ नाक्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे जिव घेणे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना या खड्या मुळे मोठा त्रास सोसावा लागत आहे. या मार्गावरील पडलेल्या खुडयांची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी असंख्य वाहन धारकांकडुन करण्यात येत आहे.

यावल ते भुसावळ या मार्गावर गावाबाहेरील जुना भुसावळ नाक्याच्या धोकादायक वळणावर तसेच शहरातील भुसावळ टी पॉईंट या मुख्य चौका जवळ रस्त्याच्या मध्यभागी फार मोठमोठे जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. वाहनांची मोठी वर्दळ असणारा हा प्रमुख मार्ग असुन या ठीकाणी वाहनधारकांना वाहन चालवितांना वाहनधारकाला खड्डा वाचविण्यासाठी आपले जिव धोक्यात टाकुन वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डा वाचवितांना या ठीकाणी भिषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नाकडे यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष देवुन या रस्त्यावरील जिवघेणारे खड्डे तात्काळ रस्ता दुरुस्त करून बुजावे खडडयामुळे होणारे संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी असंख्य वाहनधारकांकड्डव होत आहे.

Exit mobile version