Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या वादातून तरूणावर प्राणघातक हल्ला !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पटेल टी सेंटर जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला 3 जणांनी लोखंडीपाईट आणि चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, अजी मोद्दीन रिसा लोद्दीन शेख (वय-३२) रा. ग्रीन पार्क, खडका रोड, भुसावळ हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ जानेवारी रोजी त्याचा लहान भाऊ रई सोद्दीन शेख व त्याचा मित्र शाहरुख खाटीक यांचे काही जणांसोबत भांडण झाले होते. या भांडणाच्या कारणावरून शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहरातील पटेल टी सेंटरजवळ अजी मोद्दीन शेख याला संशयित आरोपी काफील खान उर्फ बंटी शकील खान वय-३६, रेहान शकील खान वय-२०, आणि शदाबखान खान उर्फ गोलू शकील खान वय-२६ (तिघे रा. मुस्लिम कॉलनी, खडकारोड, भुसावळ) यांनी शिवीगाळ करत चाकू आणि लोखंडी पाईपने वार करून अजी मोद्दीन रिसा लोद्दीन शेख याला गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळ येथून पसार झाले. जखमी झालेल्या अजी मोद्दीन याला भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. दरम्यान त्याने दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे हे करीत आहे.

Exit mobile version