पॅन-आधार लिंकसाठी मुदत वाढविली

AadharPan link

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पॅनकार्ड आणि आधारला लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने आता मार्च अखेर २०२० पर्यंत मुदत वाढविली आहे. आधी याची मुदत ३१ डिसेंबर होती.

केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याचे प्रत्येक नागरिकाला निर्देश दिले आहेत. याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार होती. मात्र अनेक नागरिकांनी अद्यापही या प्रकारचे लिंकींग केले नसल्याने आता याची मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधार आणि पॅन लिंकींगसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत आठ वेळेस मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे आता ज्यांनी या प्रकारचे लिंकींग अद्यापही केलेले नाही अशा नागरिकांना मुदतवाढ मिळालेली आहे.

Protected Content