Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दाऊदच्या भारतातील आणखी १४ मालमत्तांचा लिलाव होणार

article lwpnqaimqq 1449643346

मुंबई (वृत्तसंस्था) दोन आठवड्यांपूर्वीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा १.८ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आलेला असतानाच आता त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील १४ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या सर्व मालमत्ता दाऊदची बहिण हसीना पारकर आणि त्याच्या आईच्या नावे आहेत. अँटी स्मगलिंग एजन्सी या संपत्तीचा लवकरच लिलाव करणार आहे.

 

दाऊदच्या खेडमधील या तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. या बंगल्यात दाऊद नेहमी यायचा. शिवाय पेट्रोल पंपासाठीचा एक प्लॉटही आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीने पुण्यातील जिल्हा मूल्य निर्धारण अधिकाऱ्याला या १४ मालमत्तांची किंमत ठरविण्यास सांगितले आहे. या सर्व मालमत्ता दाऊदच्या नावावर असून गुन्हेगारीच्या पैशातून त्याने या मालमत्ता खरेदी केल्या आहेत.

खेडमधील मुख्य मालमत्ता हसीनाच्या नावे आहे तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावे आहेत. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात. हे सर्व लोक १९८०च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे. मात्र १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे. दाऊदच्या कुटुंबातील अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. दाऊदनेही ८० च्या दशकातच भारतातून पलायन केले आहे.

Exit mobile version