Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दाऊद अद्यापही कराचीतच : लकडावालाने दिली माहिती

Ejaz Lakdawala

मुंबई, वृत्तसंस्था | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याचा दावा त्याचा एकेकाळचा सहकारी आणि सध्या मुंबई पालिसांच्या अटकेत असलेल्या एजाझ लकडावाला याने केला आहे. लकडावालाच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चौकशीदरम्यान त्याने दाऊदबाबतची ही माहिती उघड केली आहे.

 

दाऊद इब्राहिम राहत असलेल्या दोन निवासस्थानांची माहितीही लकडावाला याने मुंबई पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिली आहे. स्वतःची टोळी निर्माण करण्यापूर्वी लकडावाला हा दाऊदसाठी काम करीत होता. खंडणीचे अनेक गुन्हे, हत्या आणि दंगल घडवल्याप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा होता. मुंबई पोलिसांनी त्याला नुकतेच पाटण्याच्या विमानतळावरुन अटक केली आहे.

Exit mobile version