Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात दारूडयाने सात दुचाकी पेटवल्या

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. बबलू इस्लाम अन्सारी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी बबलू कामधंदे करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंटसमोर असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी वाहने लावतात. मंगळवारी (४ जून) मध्यरात्री बबलूने अश्विनी अपार्टमेंटसमोर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळाल्या. पाच दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तपासात आरोपी बबलू अन्सारीने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत.

Exit mobile version