Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी दोनशे रुपये देण्यास नकार दिला असता तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास मारहाण केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील पांडे चौक परिसरातील ऋषिकेश अनिल मोरे वय २२ हा तरुण शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरात तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला होता. या ठिकाणी त्याला राहुल अर्जुन भगत रा.केसी पार्क कानदळा रोड जळगाव, याने दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता राहुल भगत याने हृषिकेश याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच डाव्या बाजूचे चेहऱ्यावर मारली. या घटनेत ऋषिकेश यास गंभीर दुखापत होवुन डोक्यात दोन तर चेहऱ्यावर सहा टाके पडले आहेत. याप्रकरणी जखमी ऋषिकेश याने शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून राहुल अर्जुन भगत याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहायक फौजदार भावराव इंगळे हे करीत आहेत

Exit mobile version