Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धाडसी चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पोलीसांना अव्हान

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील शिवाजीनगरात राहणाऱ्या सुशील कुमार राजमल संकलेचा यांच्या भाड्याच्या घरामध्ये शनिवार १५ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत धाडसी चोरी केली. चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीसांनी आव्हान दिले आहे.

जामनेर शहरातील शिवाजी नगरात सुशिल कुमार हे वास्तव्याला आहे. शनिवारी त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली. बंद घर फोडून घरातून साडे तीन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरी करण्यात आली. शिवाय सोन्याचे दागिनेही लांबविले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेतील चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान थाकले आहे. जामनेर शहरात गेल्या २ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तीन ठिकाणी चोरी झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी धाडसी चोरी झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा वचक संपलेला जामनेर शहरात दिसत आहे.

Exit mobile version