‘बंद पी जे रेल्वे पुन्हा सुरू करण्या’साठी धरणे आंदोलन

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी | ‘पाचोरा -जामनेर’ पी.जे. रेल्वे बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ ‘पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समिती’तर्फे पहूर बस स्थानकावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेली पाचोरा -जामनेर पी.जे. रेल्वे बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ ‘पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समिती’तर्फे येत्या शनिवार, दि. १५ जानेवारी रोजी पहूर बस स्थानकावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचे रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुमारे ब्रिटिश कालीन शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली पाचोरा जामनेर रेल्वे खरंतर गोरगरीब जनतेची जीवनवाहिनीच आहे . परंतु ‘पाचोरा ते बोदवड’ या मार्गाचे ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतर करण्याचे भासवत सदर रेल्वेच बंद करण्याचा घाट सरकारच्या वतीने घातला जात असल्याचं रेल्वे बचाव कृती समितीचं म्हणणं असून ‘पाचोरा जामनेर रेल्वे’ पूर्ववत सुरू करावी. यासाठी पाचोरा आणि जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘पी जे रेल्वे बचाव कृती समिती’ गठीत करुन शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला .

मात्र रेल्वे प्रशासनाकडून सदर रेल्वे सुरू होण्यासाठी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पीजे रेल्वे बचाव कृती समिती येत्या १५ जानेवारी रोजी पहूर बस स्थानकावर धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रेल्वे बचाव कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांच्यासह माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले.

Protected Content