दहिवद जि.प. शाळेचा चेहरामोहरा बदलला

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहिवड जि. ग्रामपंचायत 14 वित्त आयोग व लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेचे पुनरुज्जीवन करण्याचे काम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले व शाळेचा चेहरामोहराच बदलला आहे.

दहिवद जि.प. शाळेचे पुनर्जीवन करण्याचे काम ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत १४ वित्त आयोग व लोकवर्गणीतून केले व शाळेचा चेहराच बदलवून टाकला. इंग्रजांच्या बांधकामापेक्षाही पुढे पाऊल टाकत शाळेच्या छतावर कौलांच्या खाली सागाची लाकडी पाटी टाकत एक अद्भुत असे जिल्हा परिषद शाळेचे निर्माण दहिवद गावच्या सामान्य नागरिकांनी केले.

गरीबातील-गरीब व श्रीमंत अश्या प्रत्येक व्यक्तीला आपण एक चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला शिकवत आहोत ही संकल्पना गावाचे जयवंत पाटील (झी मिडिया ,मुंबई ) यांच्या मनात होती व ती गावकऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवली.
अमळनेर तालुक्यात आज बहुतांशी मराठी शाळा शेवटची घटका मोजत असतांना दहिवदकरांनी मराठी शाळा टिकली पाहिजे , समाजातील शेवटचा घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. आपण विना मुल्य (मोफत) एक सुंदर व सुसुज्ज अश्या शाळेत शिकत आहोत व आपल्या पाल्याला शिकवत आहोत हि भावना ग्रामीण भागातील जनमानसात निर्माण करण्याचे काम केले. अश्या शाळेत शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता देखिल त्याला तोडीस-तोड असली पाहिजे अशी गावकऱ्यांची अपेक्षा, मात्र ती जबाबदारी प्रशासनाकडून पार पडताना दिसून आली नाही.

शाळेची सुंदरता व सुसज्जता याचाच परिणाम स्वरूप मागच्या वर्षी दहिवद जि.प.शाळेची पटसंख्या २२४ होती व यावर्षी २०७ व अजूनही प्रवेश सुरूच आहेत. असे असतांना जि.प.प्रशासनाकडून मात्र सहकार्य होत नसल्याचे दहिवदकरांनी म्हटले आहे . जि.प.शाळा दहिवद येथे आठ उपशिक्षक व एक ग्रेडेड मुख्याध्यापक यांची गरज असतांना फक्त ६ शिक्षक असण्याचे कारण काय ? जि.प.शाळा दहिवद समानिकरण (कायमस्वरूपी शिक्षक रीक्त जागा ) मध्ये टाकण्याचे कारण काय ? जिल्ह्यावरून बदलीसाठी सोयीचे आर्थिक गणित जमाव यासाठीच तर हा अट्टहास नसेल ना ? असा प्रश्न दहिवदकरांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याला मांडण्याचे काम पंकज पाटील यांनी केले.
मागील दोन वर्षापासून वृक्ष मित्र पंकज पाटील यांनी वेळोवेळी गट शिक्षण अधिकारी महाजन अमळनेर व प्रशासकीय अधिकारी यांना तोंडी सुचना करून देखील त्यांनी बदल्यांचे नियोजन जिल्हा वरून होईल तो पावेतो अमळनेर तालुक्यातील कमी/जास्त शिक्षकांचे तात्पुरते समायोजन (Deputation) दहिवद शाळेवर केले नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे दहीवदकर अचंबित आहेत.

जि.प.जळगांव ,पंचायत समिती अमळनेर व ग.शि. अमळनेर यांचा हा गलथान कारभार दहीवदकर कदापि सहन करू शकत नाही असा इशारा त्यांनी दिला आहे .एकीकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी तोंडी व लेखी सुचना अधिकारी व कर्मचारी यांना देत आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच अधिकारी/कर्मचारी जिवंत असलेल्या मराठी शाळा देखिल अश्याप्रकारे नामशेष करायला निघाले आहेत असा आरोप दहिवदकरांनी केला आहे .प्रशासनाच्या या दुटप्पी वागण्यावरून त्यांनी तालुक्यातील इंग्रजी माध्यम शाळेत ग्रामीण भागातील विध्यार्थी पोहचवण्याची जबाबदारी घेतली असल्याचे दहिवद जि.प.शाळा प्रकरणावरून लक्षात येते असे देखील म्हटले आहे.

१४ ऑगस्ट २०२२ रोजी पावेतो दहिवद शाळेवर पटसंख्येनुसार शिक्षकांची उपलब्धता करून न दिल्यास . १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ४ वाजता मौजे दहिवद येथील सर्व नागरिक दहिवद जि.प.शाळा ते पंचायत समिती ,अमळनेर इथपर्यंत पायी पदयात्रा काढतील असा इशारा गटविकास अधिकारी अमळनेर यांना दिला आहे. दहिवद जि.प.शाळेत जोपर्यंत शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत पंचायत समिती दालनासमोर बसून राहू असे देखील वृक्ष मित्र पंकज पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content