Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली । दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ना. प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांना २०१९ या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका ट्विटच्या माध्यमातून याची माहिती दिली. आशा भोसले, मोहनलाल, शंकर महादेवन, सुभाष घई आणि बिस्वास चटर्जी या पाच ज्युरींच्या मंडळाने रजनीकांत यांची निवड केल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

१२ डिसेंबर १९५० रोजी सर्वसाधारण मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असे होते. काही काळ कंडक्टरची नोकरी केल्यानंतर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सुरवातीच्या संघर्षानंतर त्यांना या क्षेत्रात तुफान यश मिळाले. त्यांच्या अनेक चित्रपटांनी विक्रमी यश संपादन केले असून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांचा महानायक म्हणून संबोधण्यात येते.

रजनीकांत यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये मोंदरी मोदिचू, बैरावी, मुलूम मरारूम, थलपती, मुथू, शिवाजी द बॉस, बाशा, एंथीरन, कबाली, काला आदींसह इतरांचा समावेश आहे. रजनीकांत हे रूपेरी पडद्यावरील आपल्या अनोख्या स्टाईलमुळे लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावाने सोशल मीडियात अनेक जोक्स प्रचलीत आहेत.

रजनीकांत यांना खूप मोठी फॅन फॉओवींग आहे. यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अधून-मधून रंगत असतात. याबाबत त्यांनी अनेकदा चाचपणी देखील करून पाहिली. मात्र अलीकडेच त्यांनी आपला राजकारणात प्रवेश करण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version