Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवकॉलनी स्टॉपजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्‍णू गजमल चव्हाण वय 38 रा. समता नगर जळगाव हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार 9 मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता विष्णू चव्हाण हे त्यांच्या सायकलीने शिवकॉलन स्टॉप जवळून जात होते. त्यावेळी मागून (एमएच १९ डीएस ३८०४) क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने येऊन सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत सायकलस्वार विष्णू चव्हाण हे जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवार १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता विष्णू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीचालक विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.

 

Exit mobile version