Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनपास्तरीय सायकलिंग स्पर्धेत सेंट टेरेसा स्कूलचे वर्चस्व

WhatsApp Image 2019 09 07 at 11.06.49 AM

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन आयोजित मनपास्तरीय सायकलींग स्पर्धेचे आयोजन मोहाडी रोड येथे शनिवार ७ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत सेंट टेरेसा हायस्कूल यांनी स्पर्धेत एकूण १५ गुण मिळवित स्पर्धेत वर्चस्व राखत स्वर्गीय रेश्माबाई पाटील चषक पटकाविला. तर उपविजतेपद ओरीयन हायस्कूल यांनी १२ गुण मिळविले. त्यांना स्वर्गीय सखाराम पाटील चषक देण्यात आला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : १४ वर्षाखालील मुले : भूपती चौधरी ओरियन स्कूल , अकुश भंगाळे ओरियन स्कूल, अबुजर पिंजारी मिलत स्कूल, शेख रिजवान मिलत स्कूल . १४ वर्षाखालील मुली : आकांक्षा म्हेत्रे ओरियन स्कूल , रोशनी चिंचोले. नंदिनीबाई स्कूल , जानवी महाजन प्रगती स्कूल , वेदश्री चौधरी नंदिनीबाई स्कूल.  १७ वर्षाखालील मुले :अमेय नगरकर सेंट टेरेसा स्कूल , शेगुन टोतियान सेंट टेरेसा स्कूल,क्रीश बारी सेंट टेरेसा स्कूल , अथर्व रायचंदे ओरियन स्कूल. १७ वर्षाखालील मुली : धनश्री जाधव शिवाजी कॉलेज , जीविका मराठे सेंट टेरेसा  स्कूल १९ वर्षाखालील मुले : आदित्य म्हेत्रे स्वामी विवेकानंद , चैतन्य कापुरे सेंट टेरेसा  ,तेजस वाणी बाहेती महाविद्यालय , श्रीराज बडगुजर सेंट लॉरेन्स  वरील  खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी व मेडल रमेश सखाराम पाटील यांचेकडून देण्यात आले.
विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून कमलेश नगरकर, राजेंद्र ओक, रमेश सोनवणे, पंकज शिंदे, स्वप्निल पवार यांनी काम पाहिले.

Exit mobile version