Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीएसकेचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; आयपीएलला प्रारंभ

 

 

आबूधाबी । आयपीएलच्या यंदाच्या हंगामास आजपासून सुरूवात झाली असून पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आजपासून युनायटेड अरब अमीरात म्हणजेच युएईमध्ये आयपीएल सुरू झाले आहे. कोरोनामुळे आयपीएलचा साधारणपणे एप्रिल-मे मध्ये होणारे सामने आता सप्टेंबर महिन्यात खेळविण्यात येत आहेत. आज पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होत आहे. यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version