Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन अधिकारी ठार

gun afp

रांची वृत्तसंस्था । झारखंड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (सीआरपीएफ) एका जवानांने केलेल्या गोळीबारात दोन अधिकाऱ्यांचा जगीच मृत्यू झाला असून अन्य दोनजण गंभीर जखमी आहेत.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोकारो येथे सीआरपीएफच्या २२६ व्या बटालियनच्या ‘चार्ली’ कंपनीत सोमवारी रात्री ही घटना घडली. यात सहाय्यक कमांडंट रँकच्या एका अधिकाऱ्याचा आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आणि दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यां पैकी एका सैनिकानेच हा गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले असून या ‘घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ‘शनिवारी गुमला जिल्ह्यातील सिसई विधानसभा मतदारसंघात घडलेल्या घटनेत मतदानादरम्यान काही लोकांनी एका सैनिकाची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या सैनिकाने गोळीबार केला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले.

Exit mobile version