Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरदार खतांमुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाहीच

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी सरदार कंपनीचे रासायनिक खतांचा वापर केला होता. परंतू खतामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  या घटनेला तीन महिने उलटले परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात आलेला नाही.

जामनेर तालुक्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला कपाशी पिकाला सरदार कंपनीचे खत दिल्यामुळे दिल्यामुळे मोयखेड्यासह गावांमधील शेतकऱ्यांचे शेतातील पीक वाया गेल्याची घटना घडली होती. सदर घटनेला तीन महिने उलटले असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारे संबंधित सरदार कंपनी व त्यांच्या डीलरवर कायदेशीर कारवाई झाली नसून दुसरीकडे शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शासनस्तरावरील अधिकारी व पुढारीनी फक्त आश्वासन दिले.

मात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे काय त्यांना मदत केव्हा मिळणार, या प्रतीक्षेत शेतकरी असून आता शेतकऱ्यांची न्याय हक्क व मदत मिळवून देण्यासाठी सरदार कंपनी व डीलरवर कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वकील ज्ञानेश्वर बोरसे हे न घेता शेतकऱ्यांसाठी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी  जळगाव जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना लेखी निवेदन देऊन केली.

Exit mobile version