Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा, एरंडोल व भडगाव तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान; भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पारोळा प्रतिनिधी । एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगाव तालुक्यात वादळासह मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले आहे. शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २९ मे रोजी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, कोरोना काळात शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळगता इतर दुकाने बंद ठेवली आहे. अत्यावश्यक सेवांतील दुकानदारांना ७ ते ११ ऐवजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील कोरोना परिस्थिती, नागरी समस्या, शेतकऱ्यांचा समस्यांबाबत पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तथा जळगांव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

Exit mobile version