Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

CRIME : गुरूदत्त कॉलनीतून एकाची दुचाकीसह लॅपटॉपची चोरी

जळगाव प्रतिनिधी । खोटेनगर परिसरातील गुरूदत्त कॉलनी येथून घरासमोरील पोर्चमधून दुचाकी व डिक्कीतील लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी ८ जानेवारी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, धिरज विश्वासराव पाटील (वय-४५) रा. गुरूदत्त कॉलनी, खोटेनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ एडब्ल्यू ४३०६ ) क्रमांकाची मोपेड दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ते कामावरून आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी घराच्या पोर्चमध्ये पार्किंगला लावली होती. मोपोड गाडी असल्याने त्यांनी त्यांचा १५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप देखील दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होत. रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. दरम्यान घराच्या समोरीला पोर्च मध्ये लावलेली मोपेड दुचाकी आणि लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शनिवारी ८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी त्यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेतली. धिरज पाटील यांच्या जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.

Exit mobile version