Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासीम येथील गर्भवती महिलेने आत्महत्या केल्या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, नेहा छबीलदास पाटील वय १९ रा. सावखेडासिम ता. यावल या गर्भवती विवाहित महिलेला २९ मे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल ६५ टक्केच्या वर जळालेल्या अवस्थेत असल्याने तिची प्रकृती अधिक बिघडल्याने तिला तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेे होते. येथे उपचार सुरू असतांना तिच्या पोटातील बाळाचा आदीच मृत्यू झाला होता. तर जिल्हा पेठ पोलिसांनी महीलेचा जवाब नोंदवला आहे. यात तिने सासरच्या मंडळींचे नाव घेतले होते. या प्रकरणी मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही म्हणुन शुक्रवारी मयत विवाहितेची आई रेखा भिमा पाटील रा. इंदूर व मयताचे मेव्हणे प्रशांत नथ्थु पाटील (रा. शिंदखेडा ) यांनी नातलगांसह यावल पोेलिस ठाणे गाठले. त्यांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दरम्यान दुपारी उपचार सुरू असतांना नेहा पाटील हिचा मृत्यू झाला तेव्हा कुटुंबीय अधिकचं संतप्त झाले व जोवर गुन्हा दाखल होणार नाही तोवर अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला. तेव्हा मयत विवाहितेचा जवाब जळगाव येथुन मागवण्या करीता साहय्यक पोलिस निरिक्षक सुजित ठाकरे यांनी पोलिस कर्मचारी रवाना केले. यानंतर मयताच्या नातवाईकांची समजुत काठल्यावर सावखेडासिम येथे मयतावर अंतसंस्कार करण्यात आहे. मृत महिलेस दिड वर्षाचा मुलगा देखील आहे.

Exit mobile version