Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिठ्ठीविना ऑनलाईन औषधांची विक्री करणाऱ्या वेबसाईटवर गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ऑनलाईन औषधींची विक्री करणाऱ्या ऑनलाईन वेबसाईटवर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेकायदेशीपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ‘मेशो’ या ऑनलाईन वेबसाईटसह इतर वेबसाईटवर औषधींची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार  अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी कर्मचाऱ्यासह संबंधित प्रकाराची चौकशी केली. यात जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील अमोघा हाईटस् मुंदडानगर येथील फ्लॅट क्रमांक २५ येथून ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचे समोर आले. २९ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान विविध औषधांची विक्री केल्याचेही समोर आले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी सोमवार, २ मे रोजी याप्रकराबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मीशो ऑनलाईन पोर्टलसह इतर वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

Exit mobile version