Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

CRIME : मुक्ताईनगरातील ॲग्रीकल्चर महाविद्यालयात इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ॲग्रीकल्चर महाविद्यालयातील नवीन इमारतीतून इलेक्ट्रिक साहित्य असा एकुण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर शहरातील ॲग्रीकल्चर महाविद्यालयात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंग देखील कामे करायला सुरुवात झाली आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ च्या पूर्वी याठिकाणी काम सुरू असताना अज्ञात चोरट्यानी नवीन उषा कंपनीचे १०८ कंपनीचे सिलिंग फॅन, १४८ ट्यूबलाइट, ५० लहान लाईट असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी बंद खोलीचे कुलूप तोडून चोरून नेले. यासंदर्भात गव्हर्मेंट इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट्रर प्रवीण शरद बडगुजर (वय-४९) रा. साक्री जि. धुळे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version