Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्षात बसलेल्या प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (व्हिडीओ)

Crime Loot

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेस्थानकाजवळ एखाद्या प्रवाशाला रिक्षात बसून त्याच्याकडून चाकू दाखवत रोक रक्कम व ऐवजांची जबरीलूट करणारे रिक्षासह तिघांना ताब्यात घेण्यात शहर पोलीसांना यश आले असून यातील एक आरोपी फरार आहे. दरम्यान हे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी आणि लूट केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांविरोधात घरफोडी आणि जबरीलुटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ता तसेच आरटीओचे एजंट आयुब खान राजे खान (वय 49) रा. नुराणी नगर पाचोरा हे रमजानईद निमित्त पाचोरा येथून जळगावाती फुले मार्केटमध्ये सामान खरेदी करण्यासाठी आले होते. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर टॉवर चौकात रिक्षात बसले. यावेळी या रिक्षात आरोपी तझींम बेग नसीम बेग मिर्झा उर्फ सुल्‍तान मिर्झा (वय- 26) रा. बिलाल चौक तांबापुरा, मोसीन खान नूरखान ऊर्फ शेंबड्या (वय- 25) रा. गेंदालाल मिल ह.मु. पिंप्राळा हुडको, रिक्षाचालक शोयब शेख युसुफ (वय-19) रा.शाहूनगर आणि गुड्डू उर्फ नईम बिस्ती रा. पिंप्राळा बसलेले होते. रिक्षा सरस्वती डेअरी चौकात आल्यानंतर आयुब खान यांना त्यांच्या काही हालचाली लक्षात आल्या. मात्र त्यांनी काही करण्याआगोदरच चौघांनी दमबाजी करत व चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील 13 हजार 400 रुपये सोबत त्यांचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढून त्यांना रस्त्यावर उतरून चौघेजण फरार झाले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
आयुब खान यांच्यावर आलेला प्रसंगाची माहिती शहर पोलिसात येऊन कथन केले. यावेळी एएसआय वासुदेव सोनवणे व प्रीतम पाटील यांनी लागलीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नेत्रण सीसीटीव्ही कक्षातून घटनास्थळातील चौकात लावलेले सीसीटीव्हीच्या आधारे तपासणी केली असता त्यात रिक्षा क्रमांक एमएच 19 जे 6370 असल्याचे निष्पन्न झाले.

सापळा रचून रिक्षासह तिघांना अटक, एक फरार
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.ए. सोनवणे यांना माहिती दिल्यानंतर एक पथक तयार केले. त्या पथकात पीएसआय वासुदेव सोनवणे, विजय पाटील, प्रीतम पाटील, संजय शेलार, भरतसिंग पाटील, सुनील पाटील, गणेश शिरसाळ, प्रणेश ठाकूर, रतन गीते, संजय भालेराव, दीपक सोनवणे, नवजित चौधरी, गणेश पाटील, तेजस मराठे आदींचे पथक रवाना झाले.

रिक्षा क्रमांक (एमएच 19 जे 6370) ही शाहूनगर मधील शेख युसुफ यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथक शाहूनगर जाऊन मोठ्या शिताफीने तिघांना जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. यातील आरोपी गुड्ड्या उर्फ नईम बिस्ती हा फरार झाला. दरम्यान चौघांनी ह्याच रिक्षातून शहरातील एम.जे. कॉलेज, आयटीआय परिसर, भास्कर मार्केट, नवीन बसस्थानक, सुभाष चौक, अजिंठा चौफुली, कालिंका माता चौफुली, रिंग रोड, रेमंड चौक अशा भागात दबा ठेवून प्रवाश्यांना हेरण्याचे काम जबरी लूट आणि घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

रिक्षाचा केला पाठलाग
फिर्यादी आयुब खान यांना लुटल्यानंतर त्यांनी लागलीच दुसऱ्या रिक्षात बसून आरोपींचा पाठलाग केला. त्यांना आरोपी सापडले नाही मात्र रिक्षाचा शेवटचा क्रमांक 70 एवढा लक्षात राहिला. या नंबरच्या आधारे एएसआय वासुदेव सोनवणे यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्हीच्या आधारे चौकातून गेलेल्या 70 क्रमांकाची रिक्षांची चौकशी केलेल्याने या गुन्ह्याचा छळा लावला आहे.

घरफोडीचीही दिली कबुली
शनिपेठ पोलीसात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात यातील दोघांचा समावेश होता. पोलीसांनी कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी घरफोडी केल्याचे सांगितले. या गुन्ह्यात शोएब शेख युसुफ शेख, तंझिम बेग मिर्झा, वसीम शेरली तेली (वय- 28) रा.आझादनगर हुडको, राहुल सुरेश आरके (वय-18) रा.हुडको पिंप्राळा यांचा समावेश आहे. यातील इतर दोघांना पकडण्यात देखील यश आले आहे.

 

 

Exit mobile version