Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

CRIME : लग्नात संसारोपयोगी वस्तू न दिल्याने विवाहितेचा छळ

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात संसारोपयोगी वस्तू दिल्या नाही, मुलबाळ होत नाही या कारणावरून विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रवारी रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,  जळगाव शहरातील खंडेराव नगरातील माहेर असलेल्या आयशा सद्दाम पिंजारी (वय-२२) यांचा विवाह मध्यप्रदेशातील बडवाडी येथील सद्दाम लतिप पिंजारी यांच्याशी सन २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या ३ ते ४ महिन्यानंतर विवाहितेच्या आईवडीलांना लग्नात संसारोपयोगी चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. या कारणावरून तु वेडी आहेस. मुला मुलबाळ होत नाही, तुला आजार लागला आहे. असे बोलून शिवीगाळसह शारिरीक व मानसिक छळ करणे सुरू झाला. त्यासोबत सासू, सासरे, दीर, मोठे सासरे, मोठी सासू, नणंद, नंदोई यांनी गांजपाठ केला. हा छळ सहन झाल्याने विवाहिता ह्या जळगाव येथील खंडेराव नगरात माहेरी निघून आल्यात. त्यांच्या फिर्यादीवरून पती सद्दाम लतिप पिंजारी, सासू सायरा लतिप पिंजारी, सासरे लतिप छगन पिंजारी, दिर एजाज लतीप पिंजारी, मोठे सासरे  शब्बीर छगन पिंजारी, मोठी सासू रूकसानाबी शब्बीर पिंजारी सर्व रा. बडवाणी मध्यप्रदेश, मोठे सासरे मनोहर छगन पिंजारी, मोठी सासू नजमा मनोहर पिंजारी दोन्ही रा. मदरसा, अविस्कार कॉलनी जळगाव, नणंद शहिस्ता वसिम पिंजारी, नंदोई वसीम शब्बीर पिंजारी रा. खंडेराव नगर जळगाव या दहा जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनमोल पटेल करीत आहे.

Exit mobile version