CRIME : कौटूंबीक वादातून भावावर चाकूने वार; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार (He stabbed his brother) करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी विवाहितेच्या जेठावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी सचिन सपकाळे यांचा भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरेश सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी येवून जुन्या कौटुंबिक वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर रेणूदेवी सपकाळे यांना डोक्याला मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content