Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरिविठ्ठल नगरात विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह तिघांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील मुकूंद नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या जीवन नगर येथील पतीसह सासरच्या तिघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील वनिता सोनवणे यांचा रामानंदनगर परिसरातील जीवन नगरातील किशोर दत्तात्रय सोनार यांच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी वनिता हिचे पतीसह सासरच्यांनी विविध कौटुंबिक कारणांवरुन वेळावेळी मारहाण करुन तसेच कु्रर वागणूक देवून मानसिक व शारिरीक छळ केला. छळाला कंटाळून वनिता ह्या माहेरी निघून गेल्या. याप्रकरणी वनिता सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पती किशोर सोनार, सासू विमलबाई दत्तात्रय सोनार व विनोद दत्तात्रय सोनार या तीन जणांविरोधात रामानंदनगर पेालिसात १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

 

Exit mobile version