Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीसमोर अश्लिल चाळे करणाऱ्या एकावर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीसमोर अश्लिल चाळे व हावभाव करत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. दरम्यान, गावातील शेख कासीम शेख फरीद रा. इमामवाडा रावेर हा मुलीला चिठ्ठी लिहून ‘तू मेरे से प्यार करती की नही करती’ असे लिहून मुलीच्या घरासमोर उभा राहून  अश्लिल चाळे व हावभाव करत मुलीचा विनयभंग केला. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक करीत आहे. 

Exit mobile version