Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Crime : किरकोळ वादाच्या कारणावरून एकाला लाकडी दांड्याने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे किरकोळ वादाच्या कारणावरून तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अजीज अहमद शेख फजलुल्लहक (वय-२१) रा. मोहल्ला गल्ली, नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरूण चिकन व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. शनीवार २६ फेब्रुवारी रोजी गावातील अपना चिकन सेंटर येथे पेपर वाचत असतांना गावातील शेख शोएब शेख गुलाब नबी – राहणार खाँजानगर नशिराबाद जि.जळगाव यांच्यात जुन्या किरकोळ वादाच्या कारणावरून हातातील लाकडी दांड्याने अजीज शेख याला बेदम मारहाण केली. यात त्यांच्यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता अजिज अहमत शेख यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख शोएब शेख गुलाबनबी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

Exit mobile version