Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहुल गांधींनी प्रचारानंतर केली क्रिकेट बॅटिंग

rahul gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतांना काँग्रेसचे नेते राहूल गांधी सध्या हरयाणामध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारा दरम्यान राहुल गांधींनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून राहुल गांधी बॅटींग करताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी शुक्रवारी महेंद्रगड येथे गेले होते. तेथे प्रचारसभेला
संबोधिक केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला येण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. त्याचवेळी खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग
करण्यात आले. एका कॉलेजच्या मैदान हेलिकॉप्टर उतरवावे लागले. त्यावेळी काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती. राहुल गांधी यांनी देखील
मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी बॅटिंग करत आहेत.

Exit mobile version