Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रिप्टो करंसीत फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेनेची पोलीस अधिक्षकांकडे मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने  पैसे घेऊन कोणताही मोबदला व मुद्दल रक्कम परत न देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्या भडगाव तालुक्यातील महिलांसाबत शुक्रवारी २१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना शुक्रवारी दुपारी निवेदन दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानेश्वर योगराज  देवरे, राजू कौतिकराव शेरे यांनी भडगाव येथे येऊन महिलांची बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्प कालावधीत चार पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार महिलांनी विश्वास ठेवून प्रत्येक महिलेने आपल्या परिस्थितीनुसार गुंतवणूक केली.

 

काही दिवसांनी महिलांनी त्यांना पैशाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे  दिली. नंतर पैसे देण्यास नकार दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर निलेश पाटील यांनी महिलांसह शुक्रवारी २१ जुलै रोजी जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले आहे.  निवेदनावर नीलेश पाटील यांच्यासह सीमा पाटील, भावना पाटील व इतर महिलांच्या सह्या आहेत.

Exit mobile version