Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेवारस पाय तुटलेल्या युवकाच्या मदतीसाठी गोरक्षकांची धाव

साकेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाय तुटलेल्या युवकाला दवाखान्यात नेत गोरक्षक योगेशजी पाटील यांनी दिले जीवदान सविस्तर वृत्त असे की, रेल्वे स्थानकावर बेवारसपणे पडलेल्या एक तरुणाचा पाय तुटला असुन थंडीने कुडकुडत आहे अशी माहिती रात्रीला शहरातील गोरक्षक प्राणीमित्र महालेंना मिळाली घटनास्थळी धाव घेतली असता युवक एक नंबर प्लेट फार्मवर उदास बसुन थंडीने कुडकुडत होता विचारपुस करत ‌जळगाव येथील रहिवासी असुन त्याचा पाय तुटला होता दवाखान्यात नेण्यासाठी सांगितल्यास नकार‌ देत होता पण उपस्थित तरुणांनी त्याचे मन जिंकत शहरातील ट्रामा सेंटरला हलविले त्याच्या पायात किडे पडले होते ऑपरेशन करावे लागणार म्हणुन जळगावला न्या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले पुढील उपचारासाठी पोलीसांच्या मदतीने जळगाव सिव्हीला नेले या कामात योगेशजी पाटील, गोरक्षक रोहित महाले, आयुष्य टाक, रोहित गोफ यांनी व समस्त बांधवांनी सेवा दिली.

Exit mobile version