तालुक्यातील सांगवी येथे कोव्हिशिल्ड लसीकरणाला सुरूवात

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथे आमदार व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून कोव्हिशिल्ड लसीचे १२० डोस प्राप्त झाल्याने येथील जिल्हा परिषद शाळेत प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीत रूग्णांच्या मृत्यू दरात लक्षणीय वाढ झालेली आहे. ह्या मृत्यू दरात घट आणण्यासाठी सरकारने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन ह्या लसीकरणाला सुरूवात केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सांगवी येथे आमदार मंगेश चव्हाण व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे यांच्या अथक प्रयत्नांतून कोव्हिशिल्डचे १२० डोस शनिवार, १९ रोजी प्राप्त झाल्याने लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहेत. लसीकरणाला प्रारंभ करताना प्रथम लस दुर्गाबाई मानसिंग राठोड या महिलेने घेतली.

यावेळी डॉ. पोर्णिमा वाठोरे, एच. यू. राठोड, आरोग्य सेविका एन. एस. तिरमाळी, आरोग्य सेवक आर. पाटील, सरपंच डॉ. महेंद्रसिगं राठोड, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठाकरे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाधव, शिपाई राजेंद्र जाधव, कैलास राठोड, गोरख चव्हाण, संतोष ठाकरे आदी उपस्थित होते. सरपंच डॉ. महेंद्रसिगं राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओस्तवाल ( प्राथमिक आरोग्य केंद्र, रांजणगाव) व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Protected Content