Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनआधार आघाडीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर अपात्र

durgesh thkur bhusawal भुसावळ प्रतिनिधी । येथील जनआधार आघाडीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी विहित मुदतीत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने, त्यांना अपात्र करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील प्रभाग २४ अ चे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर हे २०१६ च्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. तथापि, नियमानुसार ते आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही. दरम्यान, रेखा सुनील सोनवणे यांनी ठाकूर यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या प्रकरणी खंडपीठाने जिल्हाधिकार्‍यांचा अभिप्राय मागवला होता. जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत मंगळवारी दुर्गेश ठाकूर यांना अपात्र करण्याचा निकाल न्यायालयाने दिला. या प्रकरणी तक्रारदार रेखा सोनवणे यांच्यातर्फे अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी यांनी तर दुर्गेश ठाकूर यांच्यातर्फे अ‍ॅड. एम. एस. देशमुख यांनी कामकाज पाहिले. दुर्गेश ठाकूर यांनी या प्रकरणी न्यायालयाचा निकाल मान्य करत सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे संकेत दिले आहेत. तर या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version