Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाच प्रकरणी वनविभागातील दोघांना चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी ।

चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातीन वनपाल आणि वनरक्षक यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने जुलै 2015 मध्ये रंगेहात पकडले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना चार वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुतार असून त्याचे फर्निचरचे दुकान आहे. फर्निचरसाठी आवश्यक असलेले सागवानी लाकूड लागतात. दरम्यान 21 जुलै 2015 रोजी तक्रारदार यांच्या दुकानावर काम करीत असताना जुवार्डी वनबीटचे हवलदार रघुनाथ रामदास देवरे येवून त्यांनी दुकानातील सागवान लाकडे पाहून दुकानदाराकडे लाकूड खरेदी केल्याच्या पावत्या मागितल्या परंतू त्यांच्याकडे जास्तीचे सागवान आढळून आल्याने त्यांना पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी एसीबीमध्ये तक्रारदाराने 23 जुलै 2015 रोजी तक्रार दाखल केल्यानंतर चाळीसगाव वनपरिक्षेत्र विभागातील वनपाल रघुनाथ रामदास देवरे व वनरक्षक विठ्ठल भास्कर पाटील यांना 5 हजार रूपये स्विकारतांना 28 जुलै 2015 रोजी रंगेहात पकडले.

या खटल्यातील तपासाधिकारी सुनिल भाबड यांनी दोषारोपण अहवाल न्यायालयात दाखल केला. यात तक्रारदार, पंच, सक्षम अधिकारी, वनसंरक्षक यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय. लाडेकर यांनी वनपाल रघुनाथ रामदास देवरे व वनरक्षक विठ्ठल भास्कर पाटील या दोघांना दोषी ठरवत दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अन्वये तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद. व कायदाच्या कलम 13 (1)(ड) अन्वये चार वर्षे सक्त मजूरीची शिक्षा आणि तीन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडे यांनी काम पाहिले.

Exit mobile version