Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सांडपाण्याच्या कारणावरून चौघांकडून दाम्पत्यास मारहाण

जळगाव प्रतिनिधी । घराच्या सांडपाण्याच्या कारणावरून जुनी जोशी कॉलनीत राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला चार जणांनी लोखंडी रॉड डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीष दिलीप जोशी (वय-४२) रा. जुनी जोशी कॉलनी हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी हे शेजारी राहणारे उमेश हरी लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून  गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. यात ते गंभीर जखमी झाले तर तुषार हरी लागवे, मिनाबाई हरी लागवे आणि बेबीबाई ओंकार लागवे यांनी गिरीष जोशी यांची पत्नी मिनाक्षी यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. यासंदर्भात गिरीष जोशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरून उमेश लागवे, तुषार लागवे, मिनाबाई लागवे आणि बेबीबाई लागवे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

 

Exit mobile version