Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मिझोरममध्ये सत्तापालट! झोरम पीपल्स मूव्हमेटने जिंकल्या 27 जागा

नवी दिल्ली-वृत्तसेवा । मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. तर एका जागेवर आघाडी आहे. दुसरीकडे, भाजपालाही २ जागांवर यश मिळालं आहे. तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर काँग्रेसला मिझोराममध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आलं आहे. २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा होती. मिझोराममध्ये तुलनेनं कमी राजकीय ताकद असलेल्या भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत.

Exit mobile version