Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : जळगावात झेरॉक्स मशीनवरून बनावट नोटा ; दोघांना अटक

f3f0d487 39b2 4561 9272 88bc8e27966c

 

जळगाव (प्रतिनिधी) चक्क झेरॉक्स मशीनवरून बनावट नोटांची प्रिंट काढून चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, तांबापुरा परिसरातील मच्छी बाजार परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांनी झेरॉक्स मशीनवरून १०० रुपयाच्या बनावट नोटांची प्रिंट मारली असून आज त्या नोटा चलनात आणण्यासाठी येणार असल्याची गुप्त खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी पोलीस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, रविंद्र भगवान पाटील, अनिल देशमुख , अनिल जाधव, सुधाकर रामदास अंभोरे, पोलीस नाईक अशरफ शेख निजामोद्दीन, दिपक पाटील या पथकाला रवाना केले. आज दुपारी अमजदखान अफजलखान वय 22 मोहम्मदीया नगर , रा.तांबापुरा व शेख रईस शेख रशीद वय 25 रा. मच्छीबाजार तांबापुरा हे दोघं जण शेरा चौकात आल्यावर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये एकूण 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपयाच्या बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून झेरॉक्स मशीन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Exit mobile version