Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळच्या नगरसेवकांनी नैतिकतेच्या आधारावर पदांचा राजीनामा द्यावा : आ. भोळे (Video)

जळगाव सचिन गोसावी । भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवकांनी सोयीचा मार्गा म्हणून आपल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीत पाठविले आहे. मात्र याआधी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे. आज लाईव्ह ट्रेंडस सोबत साधलेल्या वार्तालापात राजूमामांनी विविध विषयांवर रोखठोक भाष्य केले. पहा याचे लाईव्ह कव्हरेज.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष Jalgaon Bjp आमदार राजूमामा भोळे Mla Rajumama Bhole यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला. यात ना. जयंत पाटील यांच्या दौर्‍यात पक्षाला लागलेल्या गळतीबाबत ते म्हणाले की, कोणत्याही पक्षात इनकमींग व आऊटगोईंन हे होतच असते. यामुळे यात नवीन काहीही नाही. भुसावळ येथील नगरसेवकांनी सोयीचा मार्ग म्हणून आपल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीत पाठवून दिले. यामुळे या मंडळीला जर राष्ट्रवादीत जायचे होते तर यांनी आधी आपल्या पदांचा राजीनामा देण्याची गरज होती. यामुळे भुसावळच्या नगरसेवकांनी नैतिकतेचा आधारावर राजीनामा देण्याची मागणी आमदार भोळे यांनी केली.

राजूमामा पुढे म्हणाले की, एकनाथराव खडसे Eknath Khadse हे मोठे व आदरणीय नेते आहेत. त्यांचा आदर आधीही होता आणि पुढे देखील राहणारच आहे. तथापि, भाजप हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही कधीही सत्तेसाठी राजकारण करत नाही. शेवटी जनताच हे ठरवत असते. आमच्यातून काही जण राष्ट्रवादीत गेले तरी तेथे देखील अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे तेथून देखील काही जण आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. असे चालतच राहते असे प्रतिपादन त्यांनी केले. तर नाथाभाऊंच्या जाण्याने आगामी निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा देखील आमदार राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी केला.

खालील व्हिडीओत पहा आ. राजूमामा भोळे नेमके काय म्हणालेत ते ?

Exit mobile version