Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली ग्रा.पं.च्या कामांमध्ये भ्रष्टाचार !; माजी सरपंचांनी आरोप फेटाळले

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी तक्रार गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र हे आरोप माजी सरपंच कविता कोळबे यांनी फेटाळून लावले आहे. 

माजी सरपंच कविता कोळबे यांनी खुलासा दिला आहे की, मासिक सभा ग्रामपंचायत अधिनियम कलम ३६ अन्वये आयोजित करण्यात आले होते. त्या काही सभासद गैरहजर असल्याने कोरम पुर्ण न झाल्याने सभा तहकुब करून पुन्हा सभा घेण्यात आलेल्या आहे. तसेच विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यात तडवी वाड्यात पेव्हर ब्लॉक बसवणे, शेतकऱ्यांसाठी शेतरस्ता तयार करणे,  स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे व पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभीकरण करणे, गावात मागास वस्तीत एलईडी लाईट बसविणे, पाणीपुरवठा टाकी जवळील पाईपलाईन करणे, कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क, थर्मल गण, ऑक्सीमिटर, हॉयड्रोजनची फवारणी, कब्रस्थान व मागसवस्तीत मिनी हाय मास्ट बसविणे ही कामे ऑनलाईन टेन्डर करून इस्टीमेट प्रमाणे अभियंत्याच्या निगराणी खाली करण्यात आलेली आहे. मुल्यांकन करून बिले नियमाप्रमाणे मक्तेदारास देणेत आलेली आहे. यातील तडवी यांनी केलेले आरोपात खेळणी साहित्य पुरविणे, अंगणवाडी साहित्या व खरेदी, गावहाळ दुरूस्ती, शौचालय बांधकामाची कामे हाती घेण्यात आलेला नसल्याचे आरोप केला आहे. मात्र तक्रारदार गावातील ग्रामपंचायतीचे सभासद नसतांना किंवा कोणतेही पुरावे नसतांना तक्रार करणे योग्य नाही. माजी सरपंचा कविता कोळबे यांच्यावर केले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.

Exit mobile version