Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : लाचखोर कोषागार अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात

यावल-अय्युब पटेल । शेतजमिनीचा वाद असलेला दाखल दाव्याच्या निकालाची नक्कम देण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त पाचशे रूपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.  या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळे शिवारात तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे शेतजमीन आहे. शेतजमिनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याचा दावा यावल तहसील कार्यालयात दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी  दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष लोकसेवक कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी (वय-५६) रा. लोकश नगर यावल याने ५०० रूपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

 

यांनी केली कारवाई

पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजाग बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी केली

Exit mobile version