Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाण्यात कोरोनाचा कहर; रूग्णसंख्येने १ लाखाचा टप्पा ओलांडला

ठाणे वृत्तसंस्था । ठाणे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला असून बाधितांचा एकूण आकडा १ लाख २०९ इतका झाला आहे. यापैक्की ८२ हजार ९२० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, ही बाब दिलासादायक असली तरी दुसरीकडे दररोज रुग्णांच्या मृत्यूचा समोर येणारा आकडा चिंता वाढवणारा आहे. ठाणे ग्रामीणमध्ये दिवसभरात १७ (एकूण मृत्यू २२२), ठाणे ४ (७०४), कल्याण-डोंबिवली १० (४५८), नवी मुंबई ७ (४७८), मिरा-भाईंदर ६ (३२४), उल्हासनगर २ (१६१), भिवंडी ३ (२६२), अंबरनाथ २ (१६८), बदलापूर २ (५४) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, ठाणे शहरात मंगळवारी १७३ नवे करोना रुग्ण आढळले असून एकूण करोना बाधितांची संख्या २१ हजार ४९९ वर पोहचली आहे. नवी मुंबईमध्ये २७८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १९०३३ इतकी झाली आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीमध्ये करोनाचे १९६ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या २२,८४९ वर पोहचली आहे. मंगळवारी ५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा २ हजार ८३१ वर गेला आहे.

Exit mobile version