Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील टपाल कार्यालयात कोरोनाची एंट्री

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे चौकातील मुख्य टपाल कार्यालयात कोरोनाने ऐंट्री केली आहे. टपाल कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची अन्टीजन टेस्ट घेण्यात आल्याने ७ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील पांडे चौकातील टपालाचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना होम कॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची ॲन्टी रॅपीड टेस्ट घेण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळपासूनच मुख्य टपाल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश अधिक्षकांच्या यांनी काढले आहे. टपाल कार्यालयात पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी कर्मचारी उपलब्ध झाल्यावरच कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. यांची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन टपाल कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version