Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात सन्मानित करण्यात आले. 

आरोग्य दूत माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर व सिस्टर्स यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे  सन्मान करण्यात आला.  प्रथम मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांचा सत्कार नगसेविका दीपमाला मनोज काळे व माजी नगरसेवक मनोज काळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. मनीषा उगले,  डॉ. सुषमा चौधरी, डॉ. लिपिका पार्थ्यानी, डॉ. ऋतिका सदर, कल्याणी मिसाळ, डॉ. सुजाता परमार, डॉ. रेश्मा मुनोत, डॉ. निकिता निकम यांच्यासह सिस्टर अश्विनी, सपना साळुंखे, माधुरी साळुंखे, भाग्यश्री महाजन, मोहिनी वायकोळे, जयश्री धोटे, दिपाली भिसे, महाले यांना देखील शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका दीपमाला काळे, माजी नगरसेवक मनोज काळे, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा आदी उपस्थित होते. 

 

 

 

Exit mobile version